आमच्या घराजवळच दोन गणेश मंडळे आहेत. त्यातील एक गणपती बारामती शहरातील पहिला मानाचा गणपती मानला जातो. त्या मंडळाचे चालक एकच गृहस्थ आहेत. हे चालक मानाच्या गणपतीची प्रतिष्ठा लक्षात घेऊन साधेपणाने व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्सव साजरा करतात. गल्लीतील प्रत्येक घरी जाऊन उत्सवाची माहिती देतात. वर्गणीची सक्तीही नसते. तरीही माझे वडील गेले काही वर्षे वर्गणी देतात. उलट परिस्थिती दुसऱ्या मंडळाची आहे. वर्गणी दारूसाठीच खर्च होते. त्यामुळे आम्ही गेली तीन वर्षे वर्गणी देणे बंद केले आहे. आता दरवर्षी आम्हांला गल्लीत राहायचे आहे का ही भाषा ऐकावी लागते. दरवर्षी मागील वर्षांच्या येणे बाकीसह आगाऊ पावती पाठविली जाते. मुख्य म्हणजे त्यांना देता मग आम्हांला का नाही असा प्रश्न विचारला जातो. म्हणजे वर्गणी देणे हेही आपल्या मनावर अवलंबून राहिलेले नाही.
अवधूत.