गरीब देशांतील गरीब वाचकांना परवडतील अशा किमतीत ही पुस्तकं विकल्यास आम्हालाही विकत घेऊन वाचायला आवडेल. पण इथेही ती पुस्तकं प्रगत व समृद्ध देशांच्या किमतीत विकल्यास 'पायरसी' होणारच (छापील/इलेक्ट्रॉनिक). हीच कथा सॉफ्टवेरची. गेट्स हा जगातला व रोव्लिंग ही इंग्लंडातली सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे हे कळल्यावर 'आतला आवाज' काहीसा क्षीण होतो, आपण चूक/पाप करत असल्याची बोच कमी होते. शेवटी कोणत्याही युगात हरीश्चंद्र एखादाच असतो. बाकी सर्व आमच्यासारखीच स्खलनशील व पतित माणसे. लंगडे असले तरी हे समर्थन अगदीच दुर्लक्षणीय नाही.