1. मनोगतावर कंपूबाजी आहे असे आपल्याला वाटते काय?

होय, निश्चितपणे, अर्थात, अलबत,निःसंशय...

काही 'मनोगतीं' नी व्यक्त केलेली खालील मते माझ्या वरील विधानाला पुष्टी देतात...

१.'मनोगत' वर बऱ्याच वेळा तर्कापेक्षा भाबडेपणावर आधारित मते अधिक वाचायला मिळतात. त्यापेक्षा वेगळे मत म्हणजे टीकेला आमंत्रण असे म्हणून बरेच लोक फक्त गोड गोड लिहीण्यात धन्यता मानत असतील.

२. आपण म्हणता तसेच मलाही वाटते. प्रतिसाद हे अतिशय सामान्य असतात आणि भाषेचा प्रच्छन्न वापर होतो. विशेषतः अतिशय सामान्य कवितांच्या बाबतीत 'प्रतिभा' वगैरे शब्द फारच बेजबाबदारपणे वापरले जातात.

२.आपण स्वतः कोणा कंपूत सहभागी आहोत काय?

अजिबात नाही, मुळीच नाही, कदापि नाही, तिळमात्र नाही...

'तू माझी पाठ खाजव...' या वृत्तीला मी वेळोवेळी विरोध केला आहे. (इतका की चक्रपाणिंनी त्याला माझ्या 'मनोगत' वरील वावराचे व्यवच्छेदक लक्षण करून टाकले आहे!) 'मनोगत' सारख्या भासमान माध्यमात असे कंपू तयार करणे कोतेपणाचे आहे असे मला वाटते. यातून सुटका होऊन वस्तुनिष्ठ विचार वाढीस लागले, तर बरे. 

शेवटी गमतीने

योजना - जर चर्चा रंगली तर त्याचा आधार घेऊन, याच अनुषंगाने समाजशास्त्रातील, अर्थशास्त्रातील काही सूत्रे कधीतरी मांडण्याचा मानस आहे.

हे बाकी धसका घेण्यासारखे...