मी ऐकलेली माहिती अशी.
लग्नामध्ये मुहूर्तावर मंगलाष्टका सुरू होण्याआधी शेवटचा श्लोक "ताराबलं चंद्रबलं तदेव....." हा आहे (मला पूर्ण माहीत नाही). मुहूर्त पाळण्यासाठी पूर्वी घटिका पात्राचा वापर करीत. भटजींना जर घटिका पात्राचा अंदाज नसेल तर ते आधीचे श्लोक बरेच रेंगाळून म्हणायचे आणि मग शेवटच्या श्लोकाला त्यांची अगदीच घाई-गडबड उडायची.
बाकी लेख झकासच जमला आहे. फक्त एक शंका. या सर्वांना "संप्रदाय" म्हणतात की "वाक्प्रचार" म्हणतात? आणि जर "संप्रदाय" आणि "वाक्प्रचार" जर वेगवेगळे असतील तर त्यांच्यात फरक काय?