अगदी १००% आहे. पण मला वाटतं त्यात वाईट असं काहीच नाही. वर्षानुवर्षे इथे वावरल्यामुळे लोकांच्या एकमेकांशी ओळखी झाल्या आहेत आणि काही जण त्याही पुढे जाऊन चांगले मित्र-मैत्रिणी झाले आहेत. त्यामुळे त्यांचा कंपू तयार होणे साहजिकच आहे. पण नवीन लोकांना कंपूत सामावून घेण्याची मानसिकता जोवर आहे, ह्या कंपूबाजीला विरोध करण्याचे कारण नाही.
सन्जोप रावांनी म्हटल्याप्रमाणे काही वेळा सामान्य लिखाणावर कंपूने उधळलेली स्तुतिसुमने मात्र नकोशी वाटतात. पण ह्या कंपूबाजीचा त्रास वगैरे मात्र निदान मला तरी होत नाही. होईल असे वाटतही नाही.
नाही. इथला वावर बरेचदा वाचनापुरता मर्यादीत असतो, त्यामुळे कंपूबाजीला तितकासा वाव मिळालेला नाही. इथले लेखन वाढवायचे असेल तर मात्र एखाद्या कंपूत जागा मिळते का ते बघावे लागेल.