सन्जोपजी, आपला टिळकांवरचा राग स्वानुभवाधारित आहे ह्याचा खुलासा झाला.

सार्वजनिक गणेशोत्सवाला विरोध करण्यासाठी वर्गणी हे एकमेव कारण नाही. मंडळाचा कार्यकर्त्यांची विविधांगी प्रतिभा लक्षात घेता ही कारणे दरवर्षी नवनवीन रंगात समोर येत आहेत. ध्वनिवर्धकाच्या आवाजावरील ठराविक मर्यादेपलीकडे आवाज गेल्यानंतर त्याचा घरातील आजारी माणसांना त्रास होतो म्हणून तक्रार केली की ध्वनिवर्धकाचा आवाज दुप्पट करणे इथपासून 'तुमचे प्रदूषण वगैरे गेले ***च्या **त ( कार्यकर्त्याचेच शब्द!), आम्ही मनसोक्त गुलाल उधळणार म्हणजे उधळणार ( सौजन्यः गुरुजी मंडळ, पुणे) इथपर्यंत कारणांची यादी केवळ स्थलमर्यादेमुळे देता येत नाही.
शेवटी माझा विरोध (राग नव्हे!) 'टिळक' या व्यक्तीला घाऊक असा नसून त्यांनी सुरु केलेल्या एका उपक्रमाला आहे. अर्थात, संबंध लावायचाच म्हटला की कशाचाही कशाशीही लावता येईल.