एकलव्य,
वर्षानुवर्षे इथे वावरल्यामुळे लोकांच्या एकमेकांशी ओळखी झाल्या आहेत आणि काही जण त्याही पुढे जाऊन चांगले मित्र-मैत्रिणी झाले आहेत. त्यामुळे त्यांचा कंपू तयार होणे साहजिकच आहे.
--- मैथिलीशी सहमत!
पण नवीन लोकांना कंपूत सामावून घेण्याची मानसिकता जोवर आहे...
--- असे 'परोपकारी कंपू' की ज्यात नव्या लोकांना सहजगत्या व खेळीमेळीने सामावून घेतले जाते मनोगतावर आहेत व असावेतही.
आणखी एक
--- 'मनोगत'ची सदस्यसंख्या बरीच असली तरी लेखन व प्रतिसाददृष्ट्या पाहू गेल्यास 'सक्रिय' सदस्य ७०-७५च असतील. ह्या ७०-७५ ना तुम्ही 'कंपू' म्हणणार का? मी स्वतः कविता,गझल, लेख, चर्चा या सर्व प्रकारात कमी-जास्त प्रमाणात भाग घेतो व माझ्या सर्व प्रकाराच्या लेखनाला ह्या '७०-७५' मधूनच प्रतिसाद येतात ! तसेच'गझल' लिहिली तर ज्यांना 'गझल' या विषयात रुची व गती आहे अशाच मनोगतींचे प्रतिसाद येतात. साहजिकच अशा 'गटा'ला तुम्ही 'गझलवाल्यांचा कंपू' म्हणणार असलात तर म्हणा!
'कंपू' ह्या शब्दाचा उपयोग 'नापसंती'दर्शक सुरात होऊ नये ही विनंती.
जयन्ता५२