सन्जोप रावांनी म्हटल्याप्रमाणे पाटणकरांनी स्वतःवर बरेच लिहिले आहे. त्यांच्या "जिंदादिल" या संग्रहातील या आणखी काही ओळी लिहिल्याशिवाय राहवत नाहीये
मत्तगंधाची जिथे रानवेलींची फुले
दिसतील तेथे जाण माझे प्रेत आहे गाडले
मोहुनी येतील जेव्हा भृंग त्या कुसुमांवरी
जाणतो मस्तीत तेथे गातील माझी शायरी
(भाऊसाहेबांचा भक्त) शशांक उपाध्ये