एकलव्य,

आधी तुमची दोन्ही प्रश्नांची उत्तरे वाचली. दोन्ही प्रश्नाची उत्तरे 'नाही' कशी आली हो? जर पहिल्या प्रश्नाचे उत्तर 'नाही' असेल तर दुसरा प्रश्नच गैरलागू ठरायला हवा. दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर 'नाही' म्हणजे तुम्हालाही कंपूबाजी जाणवते की काय? 

आता माझी उत्तरे -
१. मनोगतावर कंपूबाजी आहे असे आपल्याला वाटते काय?
हो. आहे. एक वाचक म्हणून कंपूबाजी जाणवते. आहेच याची खात्रीही पटते कधी-कधी. (पण माझ्या माहितीतील कंपूबाजांपैकी कुणी इथे प्रतिसाद लिहिलेला दिसले नाहीत.)

२.आपण स्वतः कोणा कंपूत सहभागी आहोत काय?
नाही. (कोण घेणार हो कंपूत?)

बाकी तात्यांना त्यांच्या कंपूची यादी झळकवायला सांगा ना!

छाया