वरील नियमांव्यतिरिक्त कोणत्याही कारणांसाठी व्युत्पत्तीने सिद्ध होणारे व न होणारे अनुस्वार देऊ नयेत.या नियमानुसार 'घरें, पांच, करणें, काळीं, नांव, कां, कांच, जों, घरीं' हे शब्द 'घरे, पाच, करणे, काळी, नाव, का, काच, जो, घरी' असे लिहावेत.

नियम म्हणून ठीक आहे पण मला कधीकधी प्रश्न पडतो की ही पद्धतच का पडली असावी? मला शिकवताना पूर्वी जर गांव, नांव , पांच  असे शिकवले गेलेय तर त्यामागेही कोणते तरी कारण असेलच ना. काही ठराविक शब्दच असे लिहिले जातात त्यामागे काय कारण असावे?

माझ्या गांवाचे नांव गांवातील सर्व लोक शिरगांव असं लिहितात आणि इंग्रजी स्पेलिंगही shiragaon असं करतात यामागे काय कारण असावे?

कोंकणातील लोक (की कोंकणस्थ)सानुनासिक उच्चार करतात म्हणून केवळ असं लिहायची पद्धत पडलीय का? आणि एखाद्याला (कोणत्याही कारणासाठी- जसे मला परंपरा म्हणून)असेच लिहायचे असेल तर माझे शुद्धलेखनाचे गुण कमी करणार का?

मराठी शुद्धलेखनाच्या प्रचलित नियमांप्रमाणे "ल" हे अक्षर या पद्धतीने लिहिणे चुकीचे आहे असे वाचले होते. पण एखाद्याला तो दांडीवाला "ल" लिहायचा नसेल तर?

                                      साती काळे.