कुठलीच गोष्ट, घटना, अपघात वगैरे, वगैरे विनोदाच्या परिघाबाहेर नसावी. आमचा सेन्स ऑफ़ द रिडिक्यूलस (मराठी माहीत नाही) फारच कमकुवत आहे, जाडाभरडा आहे त्याला काय करायचे?
चित्त, तुम्ही मला जे म्हणायचे हे अधिक नेमकेपणाने सांगितले त्याबद्दल धन्यवाद!
वास्तविक मी तात्यांच्या अभिप्रायाला दिलेल्या उत्तरातच हे प्रिन्सचे विडंबन नसून मोठ्या माणसांच्या चुकांचे विडंबन आहे हे स्पष्ट केले आहे. तरिही काहींना हे आक्षेपार्ह वाटते तर-
काही समीक्षक आणि हळवे वाचक मग भलते-सलते आणि भले-बुरे निष्कर्ष काढतात त्याला काय करायचे? काढू द्यायचे.
असं मी म्हणणंच बरोबर ठरेल.
साती काळे.