तेल गेलं, तूप गेलं, हाती घुपाटणं आलं. ह्या म्हणीची मला माहिती असलेली गोष्ट अशी:
एकदा आईने आपल्या लहान मुलाला तेल व तूप आणण्यास सांगितले. मुलगा ते आणायला घुपाटणे घेऊन गेला. (घुपाटण्याचा आकार साधारण वाळूच्या घड्याळासारखा असतो. फक्त खालची 'वाटी' वरच्या वाटीच्या मानाने बरीच लहान असते.) दुकानात जाऊन त्याने आधी तेल मागितले. त्यासाठी भांडे मागितल्यावर घुपाटणे पुढे केले व त्यात तेल घेतले. शेजारच्या दुकानात जाऊन तूप मागितले व त्यासाठी भांडे मागितल्यावर घुपाटणे उलटे करून पुढे केले व त्यात तूप घेतले. घरी जाऊन आईला म्हणाला "हे घे तूप." त्यावर तिने तेल कुठे हे विचारल्यावर घुपाटणे उलटे केले व "इथे" असे म्हणाला.
आता यानंतर आईने काय केले माहीत नाही! पण ही म्हण मात्र तयार झाली.