माणसांनी अस्सेच वागावे, आणि तस्सेच वागू नये असे खरे तर ठरवणे कठीण आहे.
माणसाने कसे वागावे हे इतरांनी ठरवू नये त्याचे त्याला ठरवू द्यावे. ती क्षमता येण्यासाठी बुद्धिनिष्ठ व्यक्तिवादांत प्रशिक्षणाची तरतूद आहे. त्याने स्वतःचे ध्येय व ते साधण्यासाठी उपयुक्त वैचारिक बैठक निश्चित केल्यास कुठल्या परिस्थितींत काय करावे याचा निर्णय करणे सोपे जाईल.
प्रत्येक माणूस अजून इतका उत्क्रांत होऊ शकला नाहीये की " देवाला रीटायर करावे'.
देवाला (माझ्या मते) माणसानेच आपल्या कल्पनेंतून निर्माण केलेले असल्यामुळे माणूस त्याला पाहिजे तेव्हा देवाला रिटायरही करू शकतो. "शुभस्य शीघ्रं"
सामान्य माणसाला कुठल्यातरी solid आधाराची गरज असते, त्यातूनच या सगळ्या देव-धर्म ई. 'भानगडी' उद्भवतात.
त्या हळूहळू बदलतील.
थोडा विचार केला तर "देव" हा काल्पनिक आधार आहे; भरवशाचा भक्कम आधार नाही हे लक्षांत येईल.
धर्म पाळू नये असा नियम केला तर धर्म न पाळणार्यंचा एक वेगळा पंथ निर्माण होऊन,त्याचीपण हीच गत होइल...
व्यक्तिस्वातंत्र्याच्या बाबतींत कुठलीही तडजोड करायची नाही असा निश्चय केल्यास निधर्म्यांचा पंथ होण्याचे भय नाही.
कारण तसे नियम करुन माण्साची बुद्धी ( IQ, EQ, SQ) बदलणार नाही.
माणसाला इतर माणसे किंवा बाह्य नियम बदलू शकत नाहीत हे खरे. पण त्याची इच्छाशक्ति त्याला बदलू शकते. नाहीतर वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला नसता.
आपण फक्त स्वतःचे उघड्या डोळ्यांनी निरीक्षण करून स्वतःला थोडेसे उत्क्रंत करू शकतो.
सहमत. फक्त आपण स्वतःला थोडेसे नाही तर आपल्याला हवे तितके बदलू शकतो. कोठे थांबायचे ते आपल्याच हातांत असते.