एकलव्य, - आधी तुमची दोन्ही प्रश्नांची उत्तरे वाचली. दोन्ही प्रश्नाची उत्तरे 'नाही' कशी आली हो? जर पहिल्या प्रश्नाचे उत्तर 'नाही' असेल तर दुसरा प्रश्नच गैरलागू ठरायला हवा. दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर 'नाही' म्हणजे तुम्हालाही कंपूबाजी जाणवते की काय?
छायाताई...
अगदी मोक्याचा प्रश्न विचारलात खरा!
दोन प्रश्न ठेवण्याचे कारण हे की पहिल्या प्रश्नाचे उत्तर "हो" असणाऱ्यांची सोय हवी ना!!
माझ्या बाबतीत म्हणाल तर पहिल्याचे उत्तर "नाही" असल्याने कोणत्याही कंपूत सहभागी होण्याचा प्रश्नच येत नाही, त्याअर्थाने दुसऱ्या प्रश्नाचे उत्तरही "नाही"च! अर्थात पुढे मीराताईंनी दिले आहे तसे "गैरलागू" असेही उत्तर चालले असते, हेही मान्यच.