१०० मंडळे आणि १०० कार्यकर्ते यांत हाही प्रष्न पडतो कि वर्गणी द्यावी कोणाला?
तुमची देण्याची इच्छा असेल तर त्यातल्या योग्य वाटणाऱ्या मंडळास/ मंडळांस जरूर द्या. पण ठराविक एक रक्कमच दिली पाहिजे अशी दादागिरी सहन करू नका. अशाच एका गणेशमंडळाला आमच्या इमारतीतील सर्वांनी एकत्र येऊन सुनावले होते. परिणामी त्यांनी आमच्या इमारतीत येणे बंद केले आणि कधी फारशी इतर गुंडगिरीही नाही केली.