येथे सत्य कथन अपेक्षीत आहे
कृपया वाद टाळावा.
अहो म्हणजे काय. कुणी काय वाट्टेल ते न पटणारे लिहावे आणि आम्ही सत्य मानावे काय? एवढे प्रश्न उपस्थित केले आहेत अनेक मंडळींनी, त्याची उत्तरे न देता (आणि वर इतरांनी दिली नाही असे उलटे म्हणता) तुम्ही केवळ तुम्हाला न पटणारी/रुचणारी आहेत म्हणून वाद आहेत फ़क्त असे म्हणून टाळून देता आहात. मग तुम्हाला काय 'सहमत', 'धन्यवाद' , 'वा वा' एवढेच प्रतिसाद योग्य वाटतात का? की अजून काही असल्या भाकडकथा इथे 'सत्य'- कथा म्हणून लिहाव्यात असे वाटते. तुम्ही म्हणता म्हणून ते इतरानी 'सत्य' मानावे इतके आपण स्वतःला अधिकारी व्यक्ती समजता काय?
एकच महत्वाचा प्रश्न. हे सगळे तुमचे बाबा फोटोतून गुप्त होणे, हवेतून अंगठी/चेन काढणे, मुठीतून उदी काढणे इ. निरूपयोगी गोष्टीचेच का भांडवल करतात हो? एखाद्या बाबाने दुष्काळी भागात जाऊन पाऊस पाडल्याचे वा एखाद्या निष्कांचन व्यक्तीस धान्य निर्माण करून दिल्याचे उदाहरण (आणि सप्रमाण, 'कोणे एके काळी, कोण्या एकास' प्रकारचे नाही) आहे का?
ज्या गोष्टींची अनुभूती इतरांना घेता येत नाही ती त्यानी खऱी का मानावी? तुम्हास ती अनुभूती असेल तर तो तुमच्या बाबांचा अनुग्रह समजून गप्प बसा की राव. इतरांनी ते मान्य करावे असा आग्रह काय म्हणून. मनोगतासारख्या खुल्या मंचावर तुम्ही काही लिहिले तर विरोधी प्रतिसाद येणारच. माझे ते खरे (विचार) आणि इतरांचे मात्र तर्कट/वाद असे म्हणायचे असेल तर असे विषय अशा खुल्या मंचावर आणूच नयेत.
गुरुवर्य नरहर कुरूंदकरांचा 'बुवाबाजी आणि समाज' नावाचा एक सुरेख लेख आम्हाला शाळेत होता. तो मिळाल्यास जरूर वाचावा. कुरूंदकर हे आस्तिक आणि नास्तिक दोन्ही प्रकारच्या लोकांचे आदराचे स्थान होते. कुठल्याही मुद्द्याच्या दोन्ही बाजू समतोलपणे मांडण्याबद्दल त्यांची प्रसिद्धी होती.
- (सर्व बाबांचा बाबा) विचक्षण