घाटातेली वाट
कय तिचा थाट
मुरकते गिरगते
लवते पाठोपाठ

निळी निळी परडी
कुणी केली पालथी
पानं फुलं सांडली
वरती आणि खालती.