लहान असताना विसोबा खेचर यांची एक दंतकथा ऐकल्याचे आठवते. विसोबा मंदिरात चक्क शंकराच्या पिंडीवर पाय ठेवून बसले होते. त्याना निषेधाने ते काढायला सांगताच ते सांगणाऱ्याला म्हणाले की अंगात त्राण नाही तेव्हा जरा तूच उचलून ठेव. सांगणारा तसे करायला गेला तर तो ते पाय जिथे ठेवेल तिथे पिंडी दिसायची. अखेर तो हताश झाला. मग विसोबांनी त्याला उपदेश केला की पिंडी हे केवळ रूप आहे, इश्वर सर्वत्र आहे, तो ओळखायला शिका. मात्र या कथेत पाय उचलायला सांगणारा कोण ते आठवत नाही, क्षमस्व.