विचक्षणराव,
मी म्हटले होते की,
अध्यात्मामध्ये प्रगत अशा अनेक सत्पुरुषांच्या चरित्रांमध्ये आणि त्यांच्या स्वतःच्या लिखाणामध्ये बऱ्याच अद्भुत गोष्टींचे दाखले मिळतात.
आपण म्हणता त्या गंडेदोरेवाल्या चमत्कारांबद्दलची आपली मते मला मान्यच आहेत. आणि सुशिक्षित लोक पुरोगामी बाबा शोधतात हे सुद्धा मान्यच.
पण विवेकानंद-रामकृष्णांसारख्यांना, अरविंदांसारख्यांना आलेल्या (त्यांनी लिहून ठेवलेल्या) अद्भुत अनुभवांकडे निर्देश करून मी म्हणत आहे की गंडेदोरेवाल्या बाबांमुळे खऱ्या अद्भुत जगाकडे आपण पाठ तर फिरवत नाही ना, आणि त्या जगाचे अस्तित्वच अमान्य तर करत नाही ना?