वाचायचा राहूनच गेला.

३ महिन्यांपूर्वी एका विद्यापीठातल्या संशोधकांनी विकीपीडियातली रँडम (प्रतिशब्द?) १०० पाने निवडली. त्याच विषयांवरची (विशेषज्ञांनी लिहिलेली) ब्रिटानिका विश्वकोशातली पाने निवडली. त्यांची तुलना करून त्यांनी असा निष्कर्ष काढला की विकीपीडिया जास्त विश्वासार्ह आहे.

विकीची सध्याची लेखांची संख्या आहे १,२७९,१४४. तीन महिन्यांपूर्वी फारशी कमी नसावी. त्यातली १०० पाने निवडली? १,२७९,१४४ : १०० हे कुठल्या आधारावर? मला स्वतःला आत्तापर्यंत अनेकदा चुकीची माहिती दिसून आली आहे. तज्ज्ञांना दिसली नसेल तर कमालच म्हणायची.

विकीपीडियातली माहिती ही सामूहिकरीत्या तयार होते, त्यामुळे द्रष्टानिरपेक्ष असते.

नाही. एक लेख हा एका व्यक्तिचा असू शकतो आणि त्यातील अनेक मुद्दे चुकिचेही असू शकतात.

तुम्हाला एखाद्या विषयावरील विकीपीडियातली माहिती चुकीची वाटत असेल, तर ती तुम्ही काढून टाकू शकता, आणि योग्य ती माहिती टाकू शकता.

चूक की योग्य हे कोण ठरवणार? मला योग्य वाटणारी माहिती मी घातली आणि दुसऱ्या तिसऱ्याने येऊन ती काढून टाकली किंवा बदलली तर काय उपयोग. असो. विकिच्या टर्म्स आणि कंडिशन्स (मराठी प्रतिशब्द?) सरळ याचा उल्लेख करतात की तुमची माहिती बदलली किंवा कापली जाण्याचा सरळ सरळ संभव पकडूनच येथे लिखाण करत जा.