कोण बोललं रे साहेबांना ??? गेल्या 30 सामन्यांत त्याने 1049 धावा 123 च्या सर्वाधिक स्कोरसह 37.46 च्या सरासरीने 2 शतकं आणि 6 अर्धशतकं ठोकून काढल्या आहेत. आणि हे आकडे एका 'होपलेसली आऊट ऑफ़ फ़ॉर्म' फ़लंदाजाचे आहेत !
कुठल्या अँगल नी ही आकडेवारी 'वाईट' आहे? आणि श्रीलंका अन पाकिस्तान मालिकांमधली त्याची बॅटिंग बघून तो 'कॉशस' खेळतो असं कोण म्हणेल? तो आयुष्यात 'कॉशसली' एकदाच खेळल्याचं आठवतं तेव्हा त्याने सिडनीत २४३* मारल्या !
जाऊदे... मी का टेंशन घेतोय... साहेब आले अन २ शतकं ठोकली (त्यांच्यासाठी नेहेमीचं तर आहे!) की सगळ्यांची तोंडं आपोआप बंद होतील !