ऐतिहासिक वास्तुंबद्दलचे ओकांचे पुरावे "हा सूर्य, हा जयद्रथ" या न्यायाने तपासून पाहणे सहज शक्य आहे.
मी ही हेच म्हटले नाही का? पुरावे/संदर्भ तपासावे असे म्हणतो आहे. त्यानंतरही विश्वास ठेवावासा वाटला तर जरूर ठेवावा. सर्वच चूक आहे असे जर माझे मत झाले असेल तर (तसे नाही हा मुद्दा सोडून देऊ) तर जोपर्यंत ते पारखून घेऊन बनवले असेल तर त्याबाबत तक्रार नसावी, बरोबर?
माझ्या कुठल्याच प्रतिसादात मी त्यांचे 'सर्व'/'सगळे'/'एकुणएक' लिखाण चुकीचे आहे असे म्हटलेले नाही. पुन्हा एकवार पाहू शकता. तुम्हाला तसे कुठे सापडलेच तर ते आधीच 'बिनशर्त' मागे घेतले असे म्हणतो, ठीक?. मात्र त्यांची तर्कपद्धती सदोष आहे, मोकाट आहे या मतावर मी ठाम आहे आणि त्यांचे लिखाण (मी आजपर्यंत वाचलेले) सर्वात हास्यास्पद लिखाण आहे हे ही खरेच.
-विचक्षण