गुरुदत्तला फिरोझखानने फटकावून झालेलं आहे. माला सिन्हाचा प्रवेश झाला आहे. ती क्षणभर रागाने बघत उभी आहे. अशावेळी टग्या ओरडतो,"बघत काय राहीलीस? खोच तो पदर." माला सिन्हा पदर खोचते. टग्या म्हणतो,"उचल तो चाबूक." ती चाबूक उचलते.टग्या म्हणतो,"लगाव फटके" ती लगावते. टग्या मोजतोय,"एक, दोन, तीन"
जबरा. चित्रपट फक्त एकदाच पाहून इतके सुंदर 'टाइमिंग' साधणाऱ्या टग्याचे (आपला नाही) कौतुक करावेसे वाटते.
आमची हसून हसून मुरकुंडी वळली.
आमची पण.
तात्या म्हणाले,"सिनेमाला जाऊन जो गोंधळ घातलात ते तुम्हाला शोभलं का? चांगल्या घरची मुलं ना तुम्ही? आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होऊ नये याची खबरदारी घ्यायचं भान राहू नये तुम्हाला? गरीबांच्या आनंदावर विरजण घातलंत तुम्ही. पुन्हा असं होऊ देऊ नका. " तात्यांचा दम ऐकून उरली सुरली नशा सुद्धा उतरली पण 'आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होऊ न देण्याची खबरदारी घेण्याचा तात्यांचा उपदेश मात्र माझ्या कायम स्मरणात राहीला.
तात्यांचा (आपले नाही) हा उपदेश सर्वजण पाळतील तर किती छान होईल.