मनोगतावर कंपूबाजी चालते का ?
हो. नाही म्हणणे म्हणजे सूर्याचे अस्तित्व नाकारणे होय. पण त्यामुळे काय फरक पडतो ? जे प्रतिसाद देत नाही तेव्हा असे समजावे की ते सदस्य नसून बाहेरुन पाहुणे म्हणून वाचत आहेत.
मी कुठल्या कंपूत आहे का ?
नाही. कारण मी व्यक्तिशः कुणालाही ओळखत नाही.
विनंतीः कंपूगिरी ही नेहमी येणाऱ्यांना परवडणारी चैन आहे. पण यापुढे लवकरच येथे वरचेवर न येऊ शकणाऱ्या माझ्यासारख्या सिझनल बर्डस् साठी काही वेगळे धोरण आखा हो. आम्ही आता लवकरच येथून जाऊ आणि इच्छा असूनही कधी येता येईल ते सांगता येत नाही. बाकी याबाबत जास्ती हळवे होऊ नये. खेळताना आनंद मिळणे महत्वाचे. थोडक्यात प्रतिसाद देणाऱ्यांच्या बाबतीत माझे धोरण,
जो दे उसका भी भला
जो ना दे उसका भी भला
--( सिझनल बर्ड) अभिजित पापळकर