उपक्रम ज्ञानवर्धक, माहितीपूर्ण आहे. पुस्तकांची नावे मलाही हवी आहेत.
संप्रदाय/वाक्प्रचार संबंधात शंका=-
तुमचा वाक्प्रचाराऐवजी संप्रदाय हा शब्द वापरण्यामागची भूमिका वाचल्यावर वाक्प्रचार ह्या शब्दाबद्दल अधिक विचार केला. वाक्प्रचार हा "अमूक करणे" अशा स्वरूपात बहुतेकवेळा मांडला गेला असल्यामुळे वाक्प्रचार हे वाक्य असले पाहिजे अशी आपली धारणा झालेली दिसते. वाक्प्रचार म्हणजे वाणीने झालेला प्रचार. मग तो शब्दाचा, पदाचा, वाक्याचा वा परिच्छेदाचा असू शकतो. त्यामुळे ह्या दृष्टीकोणातून पाहता वाक्प्रचार हाच शब्द संप्रदायापेक्षा योग्य ठरावा.
संप्रदाय हा एका ऐवजी समूहाकडे निर्देश करतो, त्यामुळे वाक्प्रचारांचा समूह हा संप्रदाय होऊ शकेल. मात्र वाक्प्रचारामध्ये 'वाणीतून प्रचार होऊन (भिन्न अर्थाने) रूढ झालेला' हा जो अर्थ समजतो तो संप्रदाय ह्या शब्दातून समजत नाही. मौखिक प्रचार झाल्याने मूळ शब्दाचे अप्रभ्रंश होऊन ते पुढे रूढ होण्याची शक्यता अभिप्रेत असते, जी संप्रदाय शब्दात नाही. (हे माझे विचार आहेत, त्यात चूक आढळल्यास कृपया खंडन करावे.)