एका प्रमुख इंग्रजी पेपरात त्या विवराची रुंदी दोन जागी ९ इंच देऊन चित्रांत दीड फूट दाखवली होती तर एका जागी तीन फुटाच्या शाफ्टचा उल्लेख होता. त्याच्याच भावंडाने १६ इंच रुंदी दिली होती. एका मराठी वृत्तपत्रात मुख्य बातमीत दीड फूट रुंदी देऊन आतल्या बाजूला १६ इंच व्यास असे वर्णन केले होते, फक्त तेच बहुधा बरोबर असावे.

'म्हशीचे एक शिंग दुसऱ्या शिंगापेक्षा सहा यार्ड इंच लांब आहे'ची आठवण झाली.

दशमान पध्दतीचा स्वीकार करून पन्नास वर्षे होऊनसुध्दा इंच फूट शिल्लकच आहेत.

याबद्दल काहीच बोलायचे नाही. भारतात निदान दशमान पद्धतीचा अधिकृतरीत्या स्वीकार तरी झाला आहे. इथे आजूबाजूच्या देशांनी मेट्रिक पद्धत स्वीकारून 'य' वर्षे लोटली तरी अमेरिका अजून (अधिकृतरीत्या!) मैल, फूट, पौंड, गॅलन सोडायला तयार नाही.