मनोगतावर मला आवडणारा माणूस म्हणजे विसोबा खेचर. मला मा्झी आवड कूणी विचारली नाही पण विषय विसोबा खेचर
यांचा आहे म्हणून गूरु विसोबा खेचरांची मला माहित असलेली माहिती सांगलीच पाहिजे.
पंढरपूराहून सूमारे पन्नास कोसांवर परभणी प्रातांत नरसीब्राम्हणी अगर नरसीबामणी नामक एक गाव आहे. नरसी हा गाव बामणी गावाखाली मोडत असे पण नरसी व बामणी या दोन गावात दहा कोसांचे अंतर आहे संत नामदेव हे मूळ नरसी बामणीचे रहिवासी नरसीपासून पाच कोसावर औंढे नागनाथ नामक पुरातन शिवक्षेत्र प्रसिध्द आहे तेथे विसोबा खेचर हे राहात असत विसोबा हे यजूर्वेदी ब्राम्हण पूर्वी सराफीचा धंदा करीत पूढे हे ज्ञानेश्वर मंडळात समाविष्ट झाल्यावर योगज्ञानात निपूण झाले, व साधू म्हणून मानले जाऊ लागले .विसोबा खेचर हे स्वत मोठे अधिकारी पुरुष होते तरी नामदेवांचे गुरु म्हणून ते अ धि क लोकमान्यता पाव ले आहेत यात शंका नाही. ज्ञानदेव व नामदेव यांच्यातला अभंग साधा म्हणजे विसोबा खेचर होत .विसोबा खेचर ज्ञानेश्वरांना व सोपानदेवांना गूरु मानीत
विसोबांना खेचर ही पदवी ज्ञानेश्वरांनीच दिली असावी, खेचर म्हणजे आकाशातून जाणारा .ज्ञानेश्वरीत योगात खेचर कोणास
म्हणतात ते सांगतिले आहे. योगाभ्यासाने कूंडलीनीचे तेज प्रगट होऊन ती वायूरुप होते तेव्हा योग्याचा देह सावयव असला तरी
जणू वायूचाच बनला आहे असा हलका होतो .*तैसे होय शरीर .तै म्हणीजे खेचर. हे पद होता चमत्कार, पिंडजनी *याप्रमाणे शरीर
अधांतरी तरंगू लागले म्हणजे त्याला खेचर म्हणतात .आजच्या तासाला इतकेच बाकीच्या पूढच्या तासाला ...