'अनुच्चारित अनुस्वार हे अनुच्चारित असले तरीही लिहिले जाणेच योग्य असावे' असाही एक प्रतिवाद (योग्य कारणासह आणि फार छान उदाहरणासह) एकदा वाचनात आला होता.

खरे आहे. कधी-कधी अनुस्वार लिहिणे जाणे योग्य असते. तुम्ही दिलेली उदाहरणे योग्यच आहेत. प्रतिसाद आवडला. मला एका विदुषींनी असेच एक चांगले उदाहरण दिले.
खालील वाक्य वाचा -
त्या बड्या बंडवाल्यांत ज्ञानेश्वर मानें पहिला
आता ह्या प्रतिसादाच्या शीर्षकाप्रमाणे वरील वाक्यात अनुस्वार नसल्यास अनर्थ होईल.
तसेच कुसुमाग्रजांच्या कुठल्याशा कवितेची ओळ आहे ही कोण बाहुलीं.
आता इथे बाहुलाचे बहुवचन अभिप्रेत आहे. ही कोण बाहुली नव्या नियमांनुसार असे केल्यास. हूज़ दिस डोल, असा अर्थ निघेल.