मृदुलाताई आणि वरदाताई,

मनमोकळ्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार. या प्रतिसादांचा योग्य मान राखून पुढील खुलासा करायचा प्रयत्न करतो आहे. कृपया त्यास कोणत्याही प्रकारचे समर्थन, स्वान्तसुखाय केलेल्या लेखनातील चुका झाकण्याचा प्रयत्न, मुज़ोरी वा तत्सम समज़ू नये ही नम्र विनंती.

प्रस्त्तुत कवितेतील (स्त्री) प्रतिमांचा वापर हा सांकेतिक शब्दोपयोजन (conventional usage of words/phrases) आहे. 'बांगड्या भरणे', 'पदर फेडणे', 'विनयभंग' अशा शब्दयोजनांमधून स्त्रीवर्गास किंवा अन्य कोणत्याही वर्गास उणेपणा आणणे किंवा त्यांची विटंबना करणे असा उद्देश आणि प्रयत्न दोन्ही नाही. या शब्दप्रयोगांचे/वाक्प्रचारांचे प्रचलित अर्थच येथेही अपेक्षित आहेत. अशा संकेतांचे आपण आपल्या लेखनात का, कसे, कितपत उपयोजन करावे, याबद्दल माझी ठाम मते तयार नाहीत. सबब, हे संकेतार्थ आहेत त्याच स्वरूपात पाळले गेले आहेत. तरीही ते कोणाला offensive, आक्षेपार्ह वाटत असतील तर त्यांच्या वापराबाबत यापुढे काळजी घेईन एव्हढे नक्कीच सांगू शकतो.

पुन्हा एकदा धन्यवाद.