वा मुक्ता,
प्रत्येक कडव्यातला आशय अतिशय सुंदर,तरलतेच्या अत्युच्च सीमा गाठणारा,....जे जाणवले ते थोडक्यात लिहितो आहे, चु.भु.द्या घ्यावी.
काळे काळे मेघ
मनात साठवून दमलेलं.. प्रेम द्यायला आसुसलेले मन!
मनातले सारे दाह
थेंबाथेंबांनी विझवणारा..... दीर्घ विरहानंतर झालेले मीलन...मनाला सुखावणारे, पण सावकाश....यात आवेग आहे पण वेग नाही असे म्हणु का?
एक पवन
उन्मादात घोंगावणारा
पिंपळाच्या सतारीतून..प्रणयगीत छेडणारा.. निसर्गात दिसणारी आपल्याच मस्तीत धुंद असणाऱ्या प्रियकराची प्रतिमा!
एक पावसाळा
आपल्या स्वप्नात रंगलेला
हृदयाच्या पाकळीत
खोल खोल जपलेला!.... सगळ्या कडव्यांवर कळस ठरलेल्या ओळी...!
पण हा अर्थ-वाचनाचा प्रकार नकोच, उगाच कवितेतील नाजुक आशयाला धक्का पोहोचयाचा,...त्याच्या हृदयातील एखादी पाकळी उगाच कोमेजुन जायची.... श्रावणालाही भिजविणाऱ्या ह्या ओळी लिहिल्याबद्दल अभिनंदन!
-मानस६