मृदुलाशी सामान्यतः सहमत.
मी मनोगतावर आलो तेंव्हा सदस्यसंख्या तीन आकडी होती. त्यामुळे जुने लोक असले तरी या चक्रातून जावे लागले नाही असे वाटते.
वैयक्तिक कंपूबाजीपेक्षा इथे अनेक विचारधाराधिष्टित कंपूबाजी आहे असे वाटते. हे 'चर्चा' प्रकारात जास्ती दिसून येते. प्रत्येक चर्चेत एका विचारधारेचे लोक एकत्र येऊन दुसऱ्या विचारधारेच्या लोकांशी एकत्रितपणे चर्चा करतात. अर्थातच अशा चर्चेचे एक टोक वैयक्तिक मतभेदांकडे वळते तेंव्हा इतर लोक बाजूला होतात असे दिसते.
त्यामुळे एका चर्चेत एका बाजूने मुद्दे मांडणारे दुसऱ्या चर्चेत एकमेकांच्या विरुद्ध बाजूने मत मांडताना दिसतात.
सर्वात शेवटी, माझे आवडते-
माणूस हा समाजप्रिय प्राणी असल्याने कंपू बनणे साहजिकच आहे. त्यात काही फार मोठे पाप आहे, किंवा ते गैर आहे असे वाटत नाही. आणि मला फरकही पडत नाही.