सत्त्वशीला सामंत यांनी काही वर्षांपूर्वी लोकसत्तेत या विषयावर लेख लिहिला होता. चित्त यांनी दिलेले उदाहरण बहुधा त्याच लेखातले असावे. अनुस्वार न दिल्याने घोटाळा होण्याचे त्यांनी दिलेले अजून एक उदाहरण म्हणजे मधु मागशी माझ्या सख्या परी या गाण्यातली 'मधु पिळण्यापरी बळ न करीं' (= हातांत) ही ओळ.