हे थोडेसे British spelling vs. American spelling सारखे आहे, असे मला तरी वाटते.
एक शंका:
... Panjim vs. Panaji हा असाच काहीसा प्रकार असावा का?
Panjim, Sanvordem, Quepem ही (पणजीं, सांवर्डें, केपें यांकरिता?) रोमी-कोंकणीच्या संकेतांनुसार योग्य स्पेलिंगे असावीत का? याउलट Panaji हे रोमी-इंग्रजी संकेतांनुसार (त्यातूनही very much उच्चारित अनुस्वार वगळून... म्हणजे मराठीचे आक्रमण?) असावे का?
म्हणजे हा अगदीच Bombay vs. Mumbai किंवा Poona vs. Pune मधला प्रकार नसावा, तर दोन स्पेलिंगसंकेतांमधला कोठला संकेत पाळावा, यावरूनचा वाद असावा, अशी माझी आपली एक शंका आहे.
अर्थात यातले मला काही कळत नाही, तेव्हा तज्ज्ञ याबाबत खुलासा करू शकतील काय?
- (देशावरचा) टग्या.
प्रतिसाद लिहिताना १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरांच्या वापराबद्दल क्षमस्व!
पुन्हा एकदा: प्रतिसाद लिहिताना १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरांच्या वापराबद्दल क्षमस्व!
त्रिवार: प्रतिसाद लिहिताना १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरांच्या वापराबद्दल क्षमस्व!
आणखी एकदा: प्रतिसाद लिहिताना १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरांच्या वापराबद्दल क्षमस्व!!! (कितीदा माफी मागायची? कान धरून १० उठाबशा काढू का?)
काढल्याच पाहिजेत! एक... दोन... तीन... चार... पाच (पांच)... सहा... सात... आठ... नऊ... दहा...
हुश्श! दमलो बुवा! पण प्रतिसाद घेतला एकदाचा!