टग्यादादा - मिळाला थोडा वेळ... ही घाईत आणि उडत उडत केलेली मांडणी. सांभाळून घ्या... पण कोठे ठोकावेसे वाटले तर बिलकुल मागेपुढेही पाहू नका!!
 
आपल्या आणि वृकोदरांच्याही खालील विधानांकडे पाहण्याची माझा थोडा वेगळा दृष्टिकोन आहे तो आपल्या आग्रहावरून मांडला आहे.
आधीच म्हटल्याप्रमाणे त्यामुळे आपली मूळ प्रतिसादातील विधाने/ किंबहुना त्यामागील सूत्रांस आक्षेप घेण्यासारखे काहीही न वाटल्याने पहिल्या प्रतिसादात टाळले होते इतकेच!
 
मी निवडून आलो तर सगळ्यांना फुकट टीव्ही, सगळ्यंना २ रु किलोने तांदूळ, फुकट वीज असल्या मूर्ख, पोकळ आश्वासनांना ह्यातील फार लोक भुलणार नाहीत.
हो ना! फक्त 'हम मंदिर वही बनायेंगे'ला भुलतील. 'इंडिया शायनिंग'ला भुलतील. 'मेरा भारत महान', 'इक्कीसवी सदी'वगैरेंनाही भुलतील.
 
(१) फुकट टीव्ही, सगळ्यांना २ रु किलो तांदूळ इ. इ. ला माणसे भुलतच राहणार. त्याचा सुशिक्षितपणाशी काहीही संबंध नाही. पुढील पिढ्यांचे नुकसान होईल असे जरी लक्षात आले तरी आजचे भागते आहे ना मग पुढचे पुढे बघू या या नात्याने सगळीच मंडळी हात मारून घेतात असे दिसून येईल.
(२) सुशिक्षित लोकही मंदिर/इंडिया शायनिंगलाही (म्हटलेच तर सेक्युलरवाद/जातीयता/ इ.इ.) वगैरेमागील भुलभुलय्याला भुलतीलच असे नाही. भुलणार नाहीत असे तर बिलकुल म्हणत नाही. पण असे वाटते (पुरावा मागू नका!) की या आणि अशा घोषणाबाजीला भुलणाऱ्यामध्येही अशिक्षितांचेच प्रमाण कदाचित अधिक असावे. किमान सुशिक्षित/अशिक्षित अशी दरी येथे पाडता येणार नाही.
(३) फुकट टीव्ही हा अतिरेक आहे हे समजते. मात्र २ रु. किलो तांदूळ/सर्वांना मोफत वीज या सरसकट धूळफेक करण्यासाठीच मांडलेल्या योजना आहेत असे नाही. बऱ्याचदा या फसलेल्या आहेत हे जगजाहीर आहे आणि मान्यही! पण तपशिलात शिरायचेच म्हटले तर अशाच चालीवर असणाऱ्या अनेक उपयुक्त योजना चीन/कॅनडा/इस्राइल या देशांमध्ये दिसतात. आज कम्युनिझम आपल्या कर्तृत्वाने बदनाम झालेला असला तरीही अमर्त्य सेन यांनी याच धर्तीवरील भांडवलशाही पद्धतीतही चालविता येऊ शकणारे प्रयोग विकासाच्या अर्थशास्त्रातून मांडले आहेत. (असे कधीतरी वाचल्याचे आठवते. सवडीने तपशील मिळाले की पुरवेन.)
(४) राममंदिर/इन्डिआ शायनिंग/अणूक्षमता किंवा इतर postures केवळ भावना पेटविण्यासाठीच आणि political milage साठीच असतात असे नाही. तसा उपयोग करणारे अनेकजण दिसतात हे जरी खरे असले तरी या आणि अशा अनेक गोष्टींचीही स्फुल्लिंग -- जी ठिणगीच असायला पाहिजे/ किंवा असते असे नाही -- चेतविण्यासाठी, विश्वास निर्माण करण्यासाठी आवश्यकता असते. वाघावर स्वार होणे सोपे आहे उतरणे नाही याची जाणीव आहे!
(५) अवांतर - सुशिक्षित लोक कदाचित stock market ला भुलतील किंवा २०% २५% व्याजदार देणाऱ्या योजनांना भुलतील...
(६) ...
(७) ....
....