आपण जर मतदानाला पण जाणार नसलो, निवडलेल्या राजकारण्यांना त्यांच्या कामासाठी जबाबदार ठरवून एक साधा प्रश्नही विचारणार नसलो आणि जे आहे त्यात समाधान मानून अथवा ह्याला काही पर्याय नाही हे असेच चालणार असे समजणार असलो तर आपल्याला आहेत त्यापेक्षाही महाभाग राजकारणी मिळतील - राजेशाहीत "यथा राजा तथा प्रजा" असायचे आता लोकशाहीत "यथा प्रजा तथा राजा" हे सूत्र आहे.