बहुतेक कमकुवत मनाच्या माणसांना नमस्काराला एक बुवा हवा असतो.
- आध्यात्मिक मार्गावर चालताना बऱ्याच लोकांना एक चांगला गुरु पाहिजे असतो, हे तुमी सोईस्कर ईसरता राव.

जरा शिकले सवरले तर असा एखादा पुरोगामी बुवा शोधून काढतात वा चुकून एखाद्या गंडेदोरेवाल्याकडे न जाता इकडे पोचतात.
- अवो, शिकल्याली मानसं गंडेदोरेवाल्याकडे जात न्हाईत अस मला वाटत होत..

अशा माणसांना आपल्या बुवाने चमत्कार केलेला नाही त्यामुळे इतर 'पॉवरफ़ुल' चमत्कारी बाबांसमोर त्यांचा कमीपणा दिसतो असे वाटते. म्हणून ते अशा चमत्कारांच्या कथा रचतात (बहुधा त्या व्यक्तिच्या निधनानंतर) आणि प्रसृत करतात.
- तुमी म्हंता ते खरं आसन तर, नितीनरांवांनी बुवा, त्यांचा आश्रम ई. गोष्टी गुप्त ठेवल्या नसत्या..

सर्व च्या सर्व बाबा, बुवा, संत - ज्यांच्या कडूनं चमत्कार होतो ते ढोंगी असतात असे म्हनने म्हंजे माज्या मते गाडवपनाच हाये.
जगात चमत्कार पहिल्या पासून होत आलेत आनी होत जानार..
तुमी विश्वास ठेवा नाय तर नाव ठेवा..

तुमाला पुनर्जन्माचा अनुभव नाई म्हंजे जगात पुनर्जन्म न्हाई का??