(१) सहमत
(२) पण असे वाटते (पुरावा मागू नका!) की या आणि अशा घोषणाबाजीला भुलणाऱ्यामध्येही अशिक्षितांचेच प्रमाण कदाचित अधिक असावे. किमान सुशिक्षित/अशिक्षित अशी दरी येथे पाडता येणार नाही.
Let us agree to disagree on this one. 'मंदिर वहीं बनायेंगे'बद्दल कदाचित तुझे म्हणणे बरोबर असेलही - खरे तर त्याबद्दलही शंका आहे, कारण पुण्यातले इतके मारुती-गणपती सोडून अयोध्येकडे धावू पाहणाऱ्यांत पुण्यातले बरेच 'सुशिक्षित' आघाडीवर होते हे चांगलेच लक्षात आहे - पण 'इंडिया शायनिंग'ला भुलणाऱ्यांत खरे तर 'सुशिक्षितां'चाच (विशेषतः भारताबाहेरील - त्यात मीही आलो! ती धूळफेक होती हे बऱ्याच उशिरा लक्षात आले.) भरणा होता. त्यानंतरच्या निवडणुकीत भाजपचा पाडाव हा प्रामुख्याने ज्यांना 'शायनिंग' म्हणण्यासारखे काही दिसले नाही अशांकडूनच झाला. (अर्थात ते सर्व अशिक्षित होते असे म्हणण्याचा उद्देश नाही; फक्त 'शायनिंग'ला फसणारे स्वतःला 'सुशिक्षित' समजणाऱ्यातले होते, एवढेच म्हणायचे आहे.)
(३) कल्पना नाही. या विषयी काही माहीत नाही, त्यामुळे अधिक बोलू इच्छीत नाही.
(४) राममंदिर/इन्डिआ शायनिंग/अणूक्षमता किंवा इतर postures केवळ भावना पेटविण्यासाठीच आणि political milage साठीच असतात असे नाही. तसा उपयोग करणारे अनेकजण दिसतात हे जरी खरे असले तरी या आणि अशा अनेक गोष्टींचीही स्फुल्लिंग -- जी ठिणगीच असायला पाहिजे/ किंवा असते असे नाही -- चेतविण्यासाठी, विश्वास निर्माण करण्यासाठी आवश्यकता असते. वाघावर स्वार होणे सोपे आहे उतरणे नाही याची जाणीव आहे!
असहमत! असे निरुपयोगी/फसवे/विघातक स्फुल्लिंग काय कामाचे? (म्हणजे राममंदिराच्या बाबतीत निरुपयोगी आणि विघातक, आणि इंडिया शायनिंगच्या बाबतीत फसवे. आणि अणुक्षमतेच्याच बाबतीत बोलायचे झाले, तर भारताच्या आजूबाजूचा एकंदर सुरक्षामाहौल पाहता ती भारताची एक सुरक्षागरज होती हे मान्यच आहे, पण यात विशेष achievement म्हणण्यासारखे किंवा shining म्हणण्यासारखे खरे तर काहीच नव्हते. हो, त्यानंतरचा आंतरराष्ट्रीय दबाव पाहता We carried ourselves rather well हे खरेच, पण भारताची एक सुरक्षागरज पुरी झाली आणि त्यायोगे (पाकिस्तानची [त्या काळची] छुपी अणुक्षमता लक्षात घेता) nuclear deterrence, balance of power वगैरेंच्या दृष्टीने भारताची स्थिती अधिक चांगली झाली (शिवाय पाकिस्तानची अणुक्षमता उघड्यावर आली हा एक बोनस!), यापलीकडे त्याला विशेष महत्त्व खरे तर नव्हते. त्यानंतरच्या राष्ट्रीय उन्मादाला (भारतवासीयांत आणि भारतवंशीयांतसुद्धा - "Give me five*!" म्हणणाऱ्यांत माझ्यासारखेही होते) काही आधार होता, असे आज वाटत नाही.
*पाच अणुस्फोटांचा उल्लेख, आणि दुसऱ्या अर्थाने "दे टाळी!" (पाच बोटांचा उल्लेख - अमेरिकन वाक्प्रचार) अशाही अर्थी.
तसेही भारतीय अणुचाचण्यांची ही पहिलीच वेळ नव्हती, आणि इंदिरा गांधींच्या काळात झालेल्या चाचणीनंतर एवढा गदारोळ झाल्याचे आठवत नाही. (अर्थात मी तेव्हा लहान असल्याने फारसे काहीच आठवत नाही म्हणा!) आणि सध्याच्या अणुचाचण्या या भारताच्या हितसंबंधांच्या दृष्टीने आवश्यक असल्या, तरी त्यानंतरचा उन्माद म्हणा किंवा 'स्फुल्लिंग' म्हणा, हा at the very least एक byproduct होता, आणि त्याची वेळ (timing अशा अर्थी) (आणि त्यानंतर लवकरच झालेल्या निवडणुका आणि त्यांचे निकाल) पाहता created for political motives असणे अगदीच अशक्य नाही, अशी एक शंकेला जागा उरते.
तसेही चीनने अशा अणुचाचण्या कैक वेळा केल्या असतील, पण चिनी जनतेचा उन्माद/स्फुल्लिंग वगैरे तर सोडाच, चाचण्या झाल्याचाही फारसा गवगवा होत नाही.
(५) सहमत. पण या मुद्द्याचा राजकारण्यांच्या निवडणुकीतील आश्वासनांना फसण्याशी काही संबंध असावा असे वाटत नाही, तेव्हा हा मुद्दा इथे बहुधा गैरलागू असावा.
(६), (७) इ. ... येतील तेव्हा उत्तरे देईन.
- टग्या.