सोडला... फक्त एवढ्याचसाठी की विषयांतर नको... अन्य ठिकाणी जसा प्रसंग येईल तसे लिहीनच... पळवाट समजू नये!
टग्यादादा - घरी पळायच्या घाईत आहे... आणखी लिहावे लागलेच तर आता उद्या भेटू या!
(१) सहमत
(२.१) माझ्या उत्तरातील पहिला भाग अधिक महत्वाचा आहे. अनेक सुशिक्षित या मंदिर विषयापासून चार हात लांबच होते.
(२.२) किमान सुशिक्षित/अशिक्षित अशी दरी येथे पाडता येणार नाही.
प्रत्यक्ष पुरावा म्हणून विश्वास ठेवायचाच असेल तर मी स्वतः ६ डिसें ला बाबरी ढाच्यापाशी होतो. तेथेच नाही तर आजूबाजूच्या अनेक गावांत समाजाच्या कोणकोणत्या थराथरांतून माणसे होती हे प्रत्यक्ष पाहिले आहे. (१) स्वतःच सांगितलेला आणि (२) कदाचित पक्षपातीचा आरोप होऊ शकणारा या आणि इतरही कारणांनी हा पुरावा टिकणार नाही त्यामुळे आधी दिलेला नव्हता...
(२.३) 'इंडिया शायनिंग'ला भुलणाऱ्यांत खरे तर 'सुशिक्षितां'चाच (विशेषतः भारताबाहेरील - त्यात मीही आलो! ती धूळफेक होती हे बऱ्याच उशिरा लक्षात आले.) भरणा होता. त्यानंतरच्या निवडणुकीत भाजपचा पाडाव हा प्रामुख्याने ज्यांना 'शायनिंग' म्हणण्यासारखे काही दिसले नाही अशांकडूनच झाला. (अर्थात ते सर्व अशिक्षित होते असे म्हणण्याचा उद्देश नाही; फक्त 'शायनिंग'ला फसणारे स्वतःला 'सुशिक्षित' समजणाऱ्यातले होते, एवढेच म्हणायचे आहे.)
माझी भूमिका वेगळी आहे. भूमिका ठरवून मग स्पष्टीकरण शोधण्याचा प्रयत्न नाही... यावर किती विश्वास ठेवायचा हे मी माझ्या आजवरच्या मनोगतावरील वावरावर आणि त्याहूनही येथे मांडत असलेल्या सूत्रावर सोडतो. पूर्वग्र्हदूषितपणा समोरूनही राहणार नाही अशी नक्कीच आशा आहे. माझी मीमांसा अशी -
प्रचाराचा भाग गृहित धरला तरीही वाजपेयींच्या सरकारने इंडिया शायनिंग असा दावा करण्यात फार चुकले होते असे बिलकुल नाही. काही ठराविक क्षेत्रांची वेगाने होणारी प्रगती पाहून जे तुलनेने मागे पडलेल्या (येथे आपल्याप्रमाणेच मलाही ज्यांना शायनिंग दिसले नाही त्यांना अशिक्षित घोषित करायचे नाहीच.) त्यांच्याही अपेक्षा वाढल्या आणि त्याची किंमत मोजावी लागली. अर्थात हे भाजपापुरते मर्यादित न राहता यापुढील काळात सर्वच पक्षांना या वाढत्या अपेक्षांना सामोरे जावे लागणार आहे. केवळ निवडणुकांमध्ये यश मिळाले नाही म्हणजे ज्या सुशिक्षितांना शायनिंग दिसले ती निव्वळ धूळफेक ठरत नाही. (अवांतर - शायनिंगच्या जोडीला आणखी काही असते तर कदाचित सारे श्रेय शायनिंगलाच मिळाले असते की काय असे एक मनात डोकावून जाते.)
(३) कल्पना नाही. या विषयी काही माहीत नाही, त्यामुळे अधिक बोलू इच्छीत नाही.
काही उदा. मोफत शिक्षण/मोफत आरोग्यसेवा
(४) असहमत! असे निरुपयोगी/फसवे/विघातक स्फुल्लिंग काय कामाचे?
स्फुल्लिंग निरुपयोगी/फसवे/विघातक झाले की नक्कीच कामाचे नाही. ते जेव्हा तसे होईल तेव्हा त्याचा त्यागच करावयास हवा आणि पुढे सरकायला हवे.
राममंदिराच्या विषयावरून द्वेष भडकाविणे, (कोणीही) दंगली पेटविणे हे नक्कीच विघातक आहे. पण राममंदिराच्या आग्रहाची कोणाची भूमिका असणे आणि कोणत्या (उदा. भाजपा) पक्षाने तशी भूमिका मांडणे यात कोणतीही चूक नाही. देशासमोरील कोणत्या प्रश्नांना प्राधान्य द्यायचे या तारतम्यावर/अक्कलेवर त्या त्या राजकीय पक्षांचे आणि त्याहूनही त्या त्या समाजाचे देशाचेही भले होईल.
इंडिया शायनिंगच्या बाबतीत फसवे म्हणण्यापेक्षा फसलेले असे मी म्हणेन. पण तरीही आपल्या विचारांशी मिळताजुळत!
आणि अणुक्षमतेच्याच बाबतीत बोलायचे झाले, तर भारताच्या आजूबाजूचा एकंदर सुरक्षामाहौल पाहता ती भारताची एक सुरक्षागरज होती हे मान्यच आहे,
इतकेच मलाही म्हणायचे आहे. उन्मादाला अर्थ नसतो हे आपले म्हणणे शतशः मान्य. पण हा केवळ एक उन्मादच होता आणि म्हणून फसवणूक असे बऱ्याचदा ऐकू येते (आपल्याकडून नाही हो!!) म्हणून त्याचीही री ओढली.
(५) सहमत. पण या मुद्द्याचा राजकारण्यांच्या निवडणुकीतील आश्वासनांना फसण्याशी काही संबंध असावा असे वाटत नाही, तेव्हा हा मुद्दा इथे बहुधा गैरलागू असावा. म्हणूनच अवांतर! कदाचित भविष्यात अशा किंवा तत्सम प्रकारे अतिसुशिक्षितांना फसविणारा पक्ष उगवेल म्हणून उगाचच एक कल्पनाविस्तार!!
(६), (७) इ. ... येतील तेव्हा उत्तरे देईन. टोलवाटोलवी आणि झेलाझेली करीत राहू या!!