विसंगतितून विनोद निर्माण होतो म्हणतात. बातम्या वाचता वाचता मला ज्याचे हंसू आले त्या विसंगति मौजमजा या मथळ्याखाली दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे. कोणालाही दोष देण्याचा मला काय अधिकार आहे? ती आणखी एक हास्यास्पद विसंगति ठरेल.
एखादी घटना, तिचे योग्य वर्णन आणि त्यावरील प्रतिक्रिया यांच्या प्रमाणाबद्दल कांही आडाखे असतात. त्या प्रमाणाबाहेर कांही घडल्यास ते विसंगत वाटते एवढेच.