नंतर थोडावेळ थांबून म्हणाल्या, "कित्येक वर्षात मी अशोकाची फुलंच पाहिल्याचं आठवत नाहीये."
हाहा.काय सीन आहे. बाई तरल मनाच्या होत्या तर. असो. त्या काळीही स्त्रिया मद्य प्यायच्या, मग त्याची चूळही भरायच्या. आणि हे सारे अशोकाने फुलावे म्हणून. हे कळले.
"तुम्ही विज्ञान शिकणार्या मुली कशा अगदी रूक्ष असता. मी कला शाखेच्या
विद्यार्थ्यांना शाकुन्तल शिकवत होते तर शकुंतलेच्या पाठवणीच्या
प्रसंगाच्या वेळी मुलींच्या डोळ्यांत पाणी आलं. आणि तुम्ही मुली 'मग ठीक
आहे, त्यात काय एवढं' असा मख्ख चेहरा करून बसल्या आहात!!"
खरेच कुलकर्णी बाईंशी सहमत व्हावेसे वाटते कधी-कधी. अरसिक ह्या मेल्या नाहीतर काय.
अनुभवकथन फारच आवडले. अजून अनुभव लिहावेत.