राधिका यांनी आधीच्या लेखाला दिलेल्या प्रतिसादात विचारले होते की -
माझ्या आईची पट्टी काळी ४ आहे असं तिला तिच्या सरांनी सांगितलं व त्याप्रमाणे काही कीजवर स्वरांची अक्षरे चिकटवून दिली. परंतू या स्वरांचे स्थान तुम्ही सांगितलेल्या स्वरस्थानांशी जुळत नाही. उजवीकडे सरांनी सांगितलेला स्वर व डावीकडे तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या कीवर जो स्वर यायला हवा तो असे देते आहे.
हा प्रश्न खरा पट्टीसंबंधित आहे म्हणून मी या लेखालाही तो प्रतिसादरूपाने चिकटवत आहे.
राधिकाताई, तुम्ही दिलेल्या माहितीमुळे माझा थोडा गोंधळ होतो आहे. माझ्या पद्धतीने उत्तर दिल्यास चालेल का? न समजल्यास सांगा.
काळी चार ही पट्टी मानली की पेटीच्या ध ला आपला सा समजायचे. यावरून सप्तक असे होईल -
पेटीचे स्वरः धं नीं सा रे ग म प ध
आपले मानलेले स्वरः सा रे ग म प ध नी र्सा
कोणतीही पट्टी घेऊन 1 3 5 6 8 10 12 13 या क्रमाने स्वर वाजवले की शुद्ध स्वरांचे सप्तक होते हे लेखात दिले आहेच.
इतर स्वर त्या-त्या संदर्भाने वाजवले/म्हटले की बरोबर येतील.
हा प्रतिसाद हिं. सं. २ च्या लेखातही दिला आहे.
उशीराबद्दल क्षमस्व.
दिगम्भा