लोकहो मी येथील दोन विद्वान लोकांच्या बुद्धिमत्तेला सलाम करतो आहे.
श्री नितीन आणि निसर्गप्रेमी या दोन महान व्यक्तींच्या सहवासाची संधी मला मनोगताने दिली याबद्दल दिली म्हणून मनोगताचे आभार. खरेतर भाग एक वरून च दोघांच्या विद्वत्तेबद्दल माझी खात्री झाली होती, परंतु मूढास काय कळते म्हणून वाद घातला. आता माझे डोळे उघडले आहेत. मी त्यांचे शिष्यत्व पत्करणार आहे. गंडाबंधन समारंभास सर्वांनी नक्की यावे.
तात्या, तुमच्या (चुकलो आपल्या ) भांडाभांड विद्यापीठाचे एखादे विभागप्रमुखपद रिकामे असेल तर माझ्या या दोन गुरूंपैकी एखाद्याची वर्णी लावाल का? दुसऱ्यासाठी मी माझी प्रा. पदाची जागा खाली करीत आहे. (अर्थात दोन जागांची सोय करावी लागली तर).
जय हो.
-विचक्षण