संख्याशास्त्राबद्दल थोडेसे. मी स्वतः संख्याशास्त्र विषयातील Ph.D. आहे. मला वाटते हा विषय आणखी विषयांतराकडे जाऊ नये. म्हणून फार लिहित नाही. फक्त इतकेच लिहितो की arbitrary निवड म्हणजे रँडम नव्हे. आणि अलिकडे अनेक तथाकथित अभ्यासाचे संख्याशास्त्रीय निष्कर्ष हे बहुधा अशा arbitrary निवडीवर आधारित असतात. एखादा संख्याशास्त्रीय अभ्यास याहून खूप अधिक माहिती मागतो. संख्याशास्त्रीय निष्कर्षाचे निम्मे यश हे तो करणाऱ्या गटाच्या अभ्यासाच्या परिस्थितीचे ज्ञान आणि हेतू याबद्दलचे निश्चित आकलन यावर अवलंबून असतात. अनेक अभ्यास हे निश्चित निकाल यावा अशा तऱ्हेनेच केले जातात आणि संख्याशास्त्राचा पुरावा देतात.
असो इतके इथे पुरे, नाहीतर संख्याशास्त्रावर नवे फाटे फुटतील.
विनंती. आपण इथे विकीबद्दल चर्चा करीत आहोत. मूळ विषय वेगळाच आहे. विकीबद्दल स्वतंत्र चर्चेचा प्रस्ताव आल्यास पुढे चर्चा करू. (आणि अहो या लेखाला माझे आधिच खूप प्रतिसाद झाले आहेत) आता इथे थांबतो.
बाकी उरल्या मुद्द्यांवर (साहेबाच्या भाषेत सांगायचे तर) let's agree to disagree.
(विचक्षण)