हे तर नेहमी होतं! एका साडीला इस्त्री नाही, दुसरीला स्टार्च नाही, तिसरीवरचा ब्लाऊज सापडत नाही, चौथीवरचा ब्लाऊज होत नाही, पाचवीचा ब्लाऊज अजून शिवून आला नाही, सहावी फॉल पिकोला दिली आहे इत्यादी, इत्यादी. त्यामुळे अनेक साड्या असल्या तरी नेसायला साडी नाही.
(आमच्या घरात ही अवस्था पेनांच्या बाबतीतही होते. घरात सगळे सुशिक्षित. तरी घरी आलेल्या पाहुण्याने 'जरा पेन देता का?' म्हटले की धावपळ सुरू. एकात रिफील नाही, दुसऱ्यात शाई नाही, तिसरं नीट उठत नाही, चौथं खरखरतंय, पाचवं ऑफिसमध्येच राहिलं, सहावं वरच्या खोलीत आहे, आता वर कोण जाणार!)