आमच्या कचेरीत कोणाचेही लग्न किंवा वास्तुशांती असली की प्रत्येकाकडून किमान ५० रु. वर्गणी घेतली जाते. ती सद्भावना म्हणून द्यायलाही काही नाही, पण ७५ पैकी फक्त ४-५ चेहरे ओळखीचे असतात. बाकी चेहरे म्हणजे 'आपण कोणाच्या वास्तुशांतीला किंवा लग्नाला वर्गणी देतो आहे' हेही माहित नसते आणि पैसेगोळा करणारा कोण आहे हे माहित नसले तरी द्यावे लागते. न दिल्यास 'आखडूपणा' चा आरोप येतो आणि ज्या व्यक्तीचे लग्न असेल तिच्यापर्यंत नकार पोहचवला जातो.