श्री नितीन आणि निसर्गप्रेमी या दोन महान व्यक्तींच्या सहवासाची संधी मला मनोगताने दिली याबद्दल दिली म्हणून मनोगताचे आभार.
विचक्षण - असे कसे हो तुम्ही फक्त नावापुरतेच विचक्षण?
एक तर या दोन व्यक्ती नाहीतच... असे आम्ही नाही तर प्रत्यक्ष गुरुदेव मला दर्शन देऊन सांगते झाले. इतके संकेत देऊनही आम्हा पामरांचा संदेह फिटतच नाही त्यामुळे त्यांनी हे कष्ट घेतले आणि पुन्हा गायब झाले.
दुसरे म्हणजे मनोगताचे कसले आभार. अहो ही तर गुरुदेवांचीच अगाध लीला. मनोगत हे केवळ निमित्तमात्र!
असो... तरीही शिष्यपरिवारातील ज्येष्ठत्वाच्या नात्याने मी आपले स्वागतच करतो. आपले विचक्षण हे नाव त्यागून रुंदकर असे करावे अशी गुरुदेवांची योजना आहे. तेव्हा आता आपल्या गंडाबंधनाच्या जय्यत तयारीस लागतो.