सहमत. गझल चांगली झाली असती पण घाई. ओढाताण.
मला कळलेच ना आयुष्य का बिलगायला आले
गळाभेटीस आले की गळा कापायला आले
ना काहीतरीच. आयुष्य बिलगायला येणे ओढाताण.
कुणाला मी विचारू जाब माझ्या सर्व वर्षांचा
इथे सारे ऋतू केवळ तिथी बदलायला आले
मी भरीचा. सर्व भरीचा. तिथी बदलायला आले ही कल्पना कुठून ढापली? उर्दू की इंग्रजी? मराठीत कृत्रिम वाटते.
कशी उमलून येताना पुन्हा कोमेजली स्वप्ने?
कशाला रातराणीला किरण चुंबायला आले ?
पहिली ओळ ठीक पण रात्र जाऊन दिवस होणे म्हणजे कोमेजणे हे ओढून ताणून.
अशी ती यायची येथे , मला सांगायची वेडी
"तुला घेऊन जाताना, मला विसरायला आले "
आपल्याला कळला नाही बुवा.
अजूनी हात जे माझ्या खुनाने माखले होते
बघा ते त्याच हातांनी मला उचलायला आले
खुनशी शेर. वरचा जे खालच्या तेपेक्षा वेगळा त्यामुळे शेर फाटतो. वरती ज्यांचेवगैरे पाहिजे बुवा. पण एकूण नेहमीचाच शेर.
"अरे मृत्यो, नको लाजू , हवे ते माग तू आता"
मला कित्येक दिवसांनी कुणी भेटायला आले
खालची ओळ उत्तम पण वरच्या ओळीने शेर मार खातो. नेहमी भेटायला येत असतील तर लाज. कित्येक दिवसांनी कोणीतरी आले म्हणून लाजू नकोस?
अजून बरेच काम व्हायला हवे होते. नेहमीप्रमाणे फार घाई केली बुवा.