अहो सचिनराव
भारत चालवण्याचा खर्च भारतीय सरकार (स्वातंत्र्यानंतर) काही स्वत:च्या खिशातून करत नाही. त्यासाठी तुमच्या माझ्यासारख्या नागरिकांकडून जमेल तेवढा कर उकळला जातो. आणि एवढं करूनही आपल्या देशातील मूलभूत सोयीसुविधा, राहणीमान काही म्हणावं तेवढं सुधारत नाही आहे. आणि हे सगळं करण्यासाठी मग सरकारला तुटीचा अर्थसंकल्प चालवावा लागतो, म्हणजे, अंथरुणापेक्षा पाय आपले नेहमीच जास्त पसरलेले असतात.
इंग्रज हे जगभर अत्यंत चतुर अर्थकारणासाठी ओळखले जातात. जेव्हा भारत आणि त्यांच्या साम्राज्यातील इतर देश चालवण्याचा खर्च आणि त्यामागचे कष्ट यांची बेरीज साम्राज्याच्या फायद्यांपेक्षा जास्त भरू लागली, तेव्हा त्यांनी अत्यंत व्यावहरिकपणे साम्राज्यातील देशांना "स्वातंत्र्य" देण्याचा निर्णय घेतला. आणि हे करताना, भारतासारखे अवाढव्य देश उद्या उठून आपल्याला डोईजड होऊ नयेत ह्यासाठी धार्मिक, राजकिय फाळण्या करून एतद्देशीयांना पांगळं करून ठेवलं. जर भारतीय सरकार ब्रिटिश सरकारपेक्षा जास्त कार्यक्षम असतं तर आजही भारत जगातील गरीब आणि अशिक्षित देशांमध्ये अग्रगण्य म्हणून का गणला गेला असता?
आणि जर आपल्याला इंग्रज आर्थिक कारणामुळे नाही, इतर काही कारणामुळे (उदा. गांधींच्या सत्याग्रहांना आणि उपोषणांना घाबरून) गेले असं वाटत असेल, तर आपलं तसं मत का नाही मांडत? म्हणजे आम्हालाही थोडी ज्ञानप्राप्ती होईल की!