कुरूंदकर सर माहिती नसणे एकवेळ समजून घेऊ शकतो हो पण माहिती करून घेण्याची इच्छा प्रदर्शित करण्याऐवजी उलट 'बुद्धीची दारे रुंदकर' असे शब्द लिहिणे म्हणजे हद्दच झाली !
कुरूंदकर सरांचा प्रत्यक्ष वरदहस्त मला अनुभवायला मिळाला नाही पण आईच्या तोंडून त्यांच्याबद्दल खूप ऐकलेलं आहे ( निसर्गप्रेमी गुरूमहाराजांबद्दल सांगतात त्याप्रमाणे नाही आहे हा अनुभव ! ) आणि त्यांचे लिखाण थोडेफार वाचलेले देखिल आहे.
स्त्रियांच्या शिक्षणाकरता त्यांच्या घरच्यांची समजूत घालण्यापासून ते त्यांची व गरीब विद्यार्थ्यांची मोफत शिकवणी घेण्यात कायम अग्रेसर असणारे कुरूंदकर सर, घरापासून कॉलेजपर्यंत चालत येताना जाडजूड पुस्तके लिलया वाचून संपवणारे कुरूंदकर सर, तापाने फणफणलेले असूनही लवकरच येऊ घातलेल्या परीक्षेत विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून 'कंप्लिट बेडरेस्ट' सांगितलेली असूनही घरात वर्ग भरवणारे कुरूंदकर सर, कॉलेजच्या लायब्ररीत कुठली पुस्तके आहेत आणि कुठली घेणे गरजेचे आहे हे विचारायला कॉलेजचा लायब्ररीयनही ज्यांचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय निर्णय घ्यायचा नाही असे व्यासंगी वाचक कुरूंदकर सर... जितकं सद्गुणगान करावं तितकं कमीच आहे कुरूंदकर सरांचं !
कुठलेही चमत्कार न करताही अनेकांची आयुष्यं सकारात्मकरितीने बदलवून टाकणारे कुरूंदकर सर मला नेहमीच वंदनीय आहेत. त्यांच्याबद्दल कोणालाही कसलीही माहिती हवी असल्यास ती या माहितीजालावर सहजी उपलब्ध आहेच, लपवण्याचा प्रश्नच येत नाही !
वि.सू. : उपरोल्लिखित सर्व अनुभवांची सत्यासत्यता कोणास पडताळून पहायची गरज पडेल असे वाटत नाही पण तशी भासल्यास त्याचीही पूर्तता करण्यात येईल ! पळवाटा शोधल्या जाणार नाहीत !!!