माझ्या समजुतीप्रमाणे ही पोर्तुगीजांनी केलेली स्पेलिंगे आहेत.

बरोबर. पण त्यात काही निश्चित संकेत आहेत - देअर इज अ मेथड इन द मॅडनेस - असे जाणवते. जसे 'श','ष'साठी x, अनुनासिकासाठी अंतिम m वगैरे. आणि (कोंकणीचे मला ज्ञान नाही, तरीही केवळ अंदाजावरून) बऱ्याच अंशी (कदाचित फार थोडे अपवाद वगळता) ही स्पेलिंगे मूळ कोंकणीबरहुकुम असावीत, पोर्तुगीज अपभ्रष्ट नसावीत (जसे मुंबईचे बॉम्बे किंवा पुण्याचे पूना), अशी शंका आहे. एवढेच म्हणायचे होते.

तेव्हा Panjimचे Panaji करण्यात कितपत तथ्य होते, एवढीच शंका आहे. (Bombayचे Mumbai किंवा Poonaचे Pune करण्यास आक्षेप नाही.) कदाचित एक (स्थानिक) संकेत झुगारून दुसरा (बाह्य) संकेत घेतला, एवढेच!

- टग्या